Ad will apear here
Next
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’


पुणे :
नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेचा तीन विरुद्ध दोन गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत असलेल्या या दोन्ही मल्लांनी असंख्य कुस्तीशौकिनांना थरारक अनुभव दिला. या लढतीत शैलेश शेळकेला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. दोन्ही मल्ल एकाच तलमीचे असल्यामुळे विजेत्या हर्षवर्धनने आपला मित्र व अंतिम लढतीचा प्रतिस्पर्धी शैलेशला खांद्यावर उचलून घेऊन स्टेजला फेरी मारत आनंद व्यक्त केला.



महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरातर्फे म्हाळुगे - बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या ६३व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सात जानेवारी २०२० रोजी सांगता झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते चांदीची मानाची गदा विजेत्याला प्रदान करण्यात आली.

खासदार श्रीनिवास पाटील आणि श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, अमनोराचे अनिरुद्ध देशपांडे, माजी खासदार अशोक मोहोळ, सुनील शेळके, नानासाहेब नवले आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

कुस्तीवरील ‘केसरी’ या आगामी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. या चित्रपटातील कलाकार प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर व अभिनेता विराट मडके, तसेच दिग्दर्शक सुजय डहाके या वेळी उपस्थित होते.

‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये अनेक नवोदित मल्ल पुढे येत आहेत. अशा मल्लांना व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा आहे,’ असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.



पवार म्हणाले, ‘यंदाची कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्राची शान आहे. या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी पैलवान तयार होतात. केसरीच्या गदा कोण पटकविणार हे कालपर्यंत जे वाटत होते, त्या सर्वांचाच अंदाज चुकीचा ठरला आहे. दोन नवीन मल्ल यासाठी पुढे आले असून, हीच खरी कुस्तीची किमया आहे.’ यंदाच्या नेटक्या आयोजनाचेदेखील पवारांनी कौतुक केले.

बाळासाहेब लांडगे म्हणाले, ‘आपल्यातील हेवेदावे बाजूला ठेवून कुस्तीसाठी एकत्र आले पाहिजे आणि महाराष्ट्रातील कुस्ती पुढे कशी नेता येईल याचा विचार केला पाहिजे.’

स्पर्धेतील सर्वसाधारण सांघिक विजेतेपद
माती विभाग
सोलापूर जिल्हा (गुण - १९०)
उपविजेतेपद पुणे जिल्हा (गुण - ८८)

गादी विभाग
सोलापूर जिल्हा (गुण - १७३)
उपविजेतेपद कोल्हापूर (गुण - १३८)

अंतिम निकाल

९७ किलो गादी विभाग
सुवर्ण – विकास सूळ (सातारा) (१५ - ८)
रौप्य – सूरज मुलानी (सोलापूर)
कांस्य – अरुण बोंगार्डे (कोल्हापूर शहर) विरुद्ध कृष्णत कांबळे (कोल्हापूर जिल्हा) (५ - ०)
कांस्य – अक्षय गरुड (मुंबई पूर्व) विरुद्ध महेश भोसले (मुंबई पश्चिम) (६ - ३)

९७ किलो माती विभाग
सुवर्ण – विशाल बनकर (सोलापूर जिल्हा) (चितपट)
रौप्य – सारंग सोनटक्के (मुंबई उपनगर)
कांस्य – दीपक कराड (लातूर)

७९ किलो माती विभाग
सुवर्ण - हणमंत पुरी (उस्मानाबाद)
रौप्य - सागर चौगुले (सोलापूर जिल्हा)
कांस्य - धर्मा शिंदे (नाशिक)

५७ किलो वजनी गट माती विभाग
सुवर्ण - आबासाहेब अटकळे (सोलापूर जिल्हा)
रौप्य - संतोष हिरुगडे (कोल्हापूर शहर)
कांस्य - ओंकार लाड (कोल्हापूर जिल्हा )

७९ किलो गादी विभाग
सुवर्ण - रामचंद्र कांबळे (सोलापूर)
रौप्य – रवींद्र खैरे (उस्मानाबाद)
कांस्य - केवल भिंगारे (अहमदनगर)
कांस्य – श्रीधर मुळीक (सातारा)

५७ किलो वजनी गट गादी विभाग
सुवर्ण – ज्योतिबा अटकळे (सोलापूर)
रौप्य - रमेश इंगवले (कोल्हापूर)
कांस्य – आतिष तोडकर (बीड)
कांस्य – संकेत ठाकूर (पुणे शहर)

६१ किलो माती विभाग 
सुवर्ण – सागर मारकड (पुणे जिल्हा)
रौप्य – निखिल कदम (पुणे शहर)
कांस्य - हनुमंत शिंदे (सोलापूर जिल्हा)

७० किलो माती विभाग
सुवर्ण - नितीन पवार (कोल्हापूर शहर)
रौप्य – मच्छिंद्र निवंगरे (कोल्हापूर जिल्हा)
कांस्य - संतोष गावडे (सोलापूर)

८६ किलो वजनी गट माती विभाग
सुवर्ण – प्रशांत जगताप (सोलापूर)
रौप्य - आकाश भिंगारे (अहमदनगर)
कांस्य – संतोष पडळकर (पुणे)

७० किलो गादी विभाग
सुवर्ण - कालीचरण सोलनकर (सोलापूर जि.)
रौप्य - दिनेश मोकाशी (पुणे जि.)
कांस्य - विकास गोरे (अहमदनगर)
कांस्य - योगेश्वर तापकीर (पिंपरी-चिंचवड)

८६ किलो गादी विभाग
सुवर्ण – वेताळ शेळके (सोलापूर जि.)
रौप्य – बाबासाहेब चव्हाण (जालना)
कांस्य – हर्षल गवते (धुळे)

९२ किलो माती विभाग 
सुवर्ण - शुभम चव्हाण (सोलापूर जि.)
रौप्य - जयदीप गायकवड (सातारा)
कांस्य - अमोल मुंढे (बीड)

७४ किलो माती विभाग
सुवर्ण - अनिल चव्हाण (कोल्हापूर)
रौप्य – आबासाहेब मदने (सोलापूर जिल्हा)
कांस्य - श्रीकांत निकम (सांगली)

६१ किलो गादी गट
सुवर्ण - विजय पाटील, कोल्हापूर
रौप्य - सागर बरडे, नाशिक जिल्हा
कांस्य - अनुदान चव्हाण, पुणे शहर 
कांस्य - सौरभ पाटील, कोल्हापूर शहर

७४ किलो गादी गट
सुवर्ण - कुमार शेलार, कोल्हापूर जिल्हा
रौप्य - स्वप्नील काशीद, सोलापूर शहर
कांस्य - अमित सूळ, सोलापूर
कांस्य - राकेश तांबूटकर, कोल्हापूर 

६५ किलो गादी गट
सुवर्ण - अक्षय हिरगुड, कोल्हापूर
रौप्य - देवानंद पवार, लातूर
कांस्य - भालचंद्र कुंभार, पुणे शहर 
कांस्य - भाऊराव सदगीर, नाशिक जिल्हा

९२ किलो गादी गट 
सुवर्ण - पृथ्वीराज पाटील, कोल्हापूर जिल्हा
रौप्य - प्रसाद सस्ते, पिंपरी चिंचवड
कांस्य - भैरव माने, सोलापूर
कांस्य - सागर मोहोळ, पुणे शहर

(हर्षवर्धन सदगीर विजयी झाला तो क्षण आणि त्यानंतर त्याने प्रतिस्पर्ध्याला खांद्यावर उचलून फिरवले तो क्षण पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZUGCI
Similar Posts
पुण्यात सुरू आहे जागतिक गो-परिषद; देशी गोवंशांच्या प्रदर्शनाचेही आयोजन पुणे : देशी गायींचे महत्त्व लक्षात येण्यासाठी आणि त्या संदर्भात जागृती करण्यासाठी पुण्यात बालेवाडी येथे कामधेनू सेवा प्रतिष्ठानतर्फे ‘वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स अँड ॲग्री एक्स्पो’ अर्थात देशी गोवंशाविषयीच्या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या निमित्ताने बालेवाडीतील मोझे महाविद्यालयाच्या मैदानावर
अझर गोट्या इलेव्हन संघाने जिंकला स्वच्छता करंडक पुणे : पुणेकरांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने माय अर्थ फांउडेशन आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अझर गोट्या इलेव्हन या क्रिकेट संघाने हा ‘स्वच्छता करंडक’ जिंकला.
संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी पाठपुरावा करणार पुणे : ख्यातनाम नाटककार, लेखक आणि शब्दप्रभू कवी राम गणेश गडकरी यांच्या १०१व्या स्मृतिदिनानिमित्त २३ जानेवारी २०२० रोजी पुण्यातील संभाजी उद्यानातील मुख्य दरवाज्याजवळ त्यांच्या प्रतिमेची व साहित्याची पूजा करण्यात आली. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गडकरींचा पुतळा संभाजी उद्यानात पुन्हा बसवण्यात यावा, अशी
सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट रंगणार दोन डिसेंबरपासून पिंपरी : ‘देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा, तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून द्यावे, तसेच मोबाइल-इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता मैदानावरील खेळण्याला प्राधान्य द्यावे यासाठी आयोजित केली जाणारी सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा यंदा दोन डिसेंबर ते १८ डिसेंबर २०१९ या कालावधीत पिंपरी येथे रंगणार आहे. पिंपरी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language